सामाजिक सहयोग उपक्रम ही संस्था नेहमीच समाजातील आर्थिक दुर्बल/वंचित घटकांच्या मदतीसाठी तत्पर असते. दि 21/12/2024 शुक्रवारी असाच एक उपक्रम संस्थेच्या सदस्यांनी पार पाडला. वाकसाई तसेच वडिवले येथील २२ कुटुंबांना वीट भट्टी कामगार व त्यांची मुले, मुली यांना देखील कपडे वाटप करण्यात आले. या कामी सुमती ताई वायकर व वीट भट्टीवरील शिक्षिका थोरवे ताई यांची बहुमोल सहकार्य लाभले. लोणावळा येथील कातकरी वस्तीच्या ४० (कुटुंबांना)आदिवासी बंधू,भगिनींना, बालकांना गरम कपडे,पांघरूणे /दैनंदिन वापराचे कपडे , थंडीचे गरम कपडे इ चे वाटप केले. सदर कपडे कॅप सदस्य तसेच समाज जाण असलेल्या बंधू,भगिनी यांचेकडून जमा झाले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ककून प्रि प्रायमरी स्कुलच्या विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनी पण कपडे देऊन उपक्रमास मोलाचे योगदान दिले.तसेच नम्रता आयकॉनिक या सोस मधून सुद्धा मदतीचा हाथ पुढे आला. समाज बांधवांनी आमच्या विविध उपक्रमात असेच सक्रिय सहकार्य करून समाजाचा स्तर उंचावण्यास हातभार लावावा इतकीच कॅप संस्थेची अपेक्षा आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप साठे यांनी आव्हान केले आहे.