13000 वह्या.... 123 शाळा.....
महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जाण्याची गडबड आहे , वारीला भरपूर लोक आपल्या लाडक्या विठोबा रखुमाईला भेटायला निघाली आहेत. एकादशीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास अखंडपणे निरंतर कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय या दिशेने होत आहे🙏 त्याच पद्धतीने वर्षभर आपल्या संस्थेची लोकं सुद्धा कधी एकदा 15 जून येतंय आणि ग्रामीण भागातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत कधी पोहोचतोय आणि त्यांना नवीन कोऱ्या वह्या देतोय याची वाट पाहत होते. आजचा दिवस उजाडला आणि कॅप संस्थेची सगळी टीम आपल्या पंढरपूरच्या दिशेने विठोबा रखुमाईच्या रूपात असलेल्या लहान चिमुकल्या मुलांना भेटायला गेली. हा एक आनंद ! तोही एक वेगळाच आहे, याची तुलना करता येणार नाही. वर्षभर परिश्रम करून मुलांसाठी वह्या जमा करणं येईल त्या माणसाला संस्थेची माहिती सांगणं फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये प्रत्येका कडून मदत जमा करून त्याच्यामध्ये स्वतःच्या कमाईतली भर टाकून आपल्या संस्थेची लोक वर्षभर वह्यांचे जमा करतात .15 जूनला बऱ्याच कुटुंबांमध्ये वह्या घेण्याची ऐपत नसते अशा मुलांसाठी आपल्या संस्थेमार्फत वह्या दिल्या जातात. वह्याआज देताना आपल्याला जेवढा आनंद होत आहे तेवढाच आनंद या चिमुकल्यांना सुद्धा झाला आहे. नवीन वह्या मिळाल्यानंतर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरच पाहायला मिळाला असेल ,खऱ्या अर्थाने आपण केलेल्या कामाची आज पावती मिळाली 🙏आपण सुद्धा लहान असताना असेच शाळेच्या पहिल्या दिवशी कसे जात होतो. आज सगळ्यांना त्यांच्या शाळेतले दिवस आठवले असतीलच 😊 आज वह्या वाटप झाल्या म्हणून थांबायचं नाही अनेक गरजू मुलांना आपल्या मदतीची गरज आहे .👍 पुन्हा एकदा नवीन जोमानं पुढच्या वर्षीसाठी तयारी करूया👍