17000 वह्या.... 168 शाळा.....
सामाजिक सहयोग उपक्रम संस्था तळेगाव दाभाडे म्हणजेच कॅप या संस्थेच्या माध्यमातून केली कित्येक वर्ष मावळ भागातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थेकडून वही वितरणाचा मोठा सोहळा पार होतो. यावर्षी सुद्धा संस्थेमार्फत तसेच समाजातील दानशूर लोकांकडून वह्या जमा करून 17000 वहि वाटप मावळ तालुक्यातील अंदर मावळ तील शेवटचे गाव कळकराई पासून पवन मावळ मधील येलघोल जबन, नाणे मावळ शेवट भाजगाव पर्यंत वहि वाटप झाले . शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन कोरी वहि हातात येते तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच असतो . संस्थेतले सगळे सभासद जीव ओतून वही उपक्रमासाठी मदत करतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता घरातून निघून दहा ते पाच या वेळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमधील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप केली जाते . मावळ भागामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे काही पालकांची. वही घ्यायची सुद्धा ऐपत नसते अशा विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत वही, शालेय वस्तू, दप्तरे रेनकोट ,चप्पल अशा प्रकारच्या विविध वस्तू वाटप केल्या जातात. यावर्षी सुद्धा संस्थेच्या मार्फत 17000 वहि वाटप करून शालेय स्टेशनरी मुलांना देण्यात आली. संस्थेच्या सगळे सभासदांचे हे खूप मोठे यश आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी योग्य त्या वेळेत योग्य ती मदत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात . या वह्या देताना संस्था खूप बारीक विचार करते पहिली ते चौथीच्या मुलांना थ्री इन वन वही देते ज्यामध्ये चौकट , दुहेरी आणि चार लाइन वहि एकत्र स्वरूपात दिली जाते . पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सिंगल लाईन आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ए फॉर साईज मोठ्या वही दिल्या जातात.