सामाजिक सहयोग उपक्रम संस्था, तथा कॅप तळेगाव दाभाडे यांचेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी, दिवाळी *फराळ*वितरण हा उपक्रम राबवण्यात आला. यंदा "पूना मर्चंट्स चेंबर यांचेकडून रास्त दरात व उत्कृष्ट असा चिवडा व बुंदी लाडू घेण्यात आला. यासाठी मा. प्रवीणभाई चोरबेले, अध्यक्ष पूना मर्चंन्ट व ग्राहक मंच पुणे चे मा. विलासजी लेले यांनी बहुमोल सहकार्य केले दि 25/10/2024 रोजी माळेगाव येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 400 विद्यार्थी/विद्यार्थिनी/कामगार वर्ग यांना फराळ देण्यात आला या आनंद सोहळ्यात संस्थेचे 40 सदस्य शाळेचा अध्यापक वर्ग,विद्यार्थी सर्वजण प्रचंड उत्साहात सामील झाले. मुलांनी कॅप प्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कलात्मक, सुंदर अशी दीपावली शुभेच्छा पत्रे बनवली होती ती सर्व संस्था सदस्यांना दिली माळेगाव आश्रम शाळेच्या विश्वस्त मा. मायाताई प्रभुणे व ग्राहक मंच चे केंद्रीय अध्यक्ष विजय सागरज़ी उपस्थित होते. मायाताई यांनी कॅप व आश्रमशाळा यांचे किती जुने व घट्ट आहे याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी कॅपचे सदस्य डॉ नितीनजी नांगरे यांनी कॅपच्या अन्य सदस्यांसोबत वाढूळे येथील वीटभट्टी तेथील चिमण्यांना दिवाळी फराळ दिला. त्याचप्रमाणे कॅपच्या काही सदस्यांनी मामूर्डी इथल्या माई देशपांडे अंध/अपंग मुलींच्या वसतिगृहहास भेट देऊन तेथील मुलींना दिवाळी शुभेच्छा व फराळ दिला व त्यांची दिवाळी गोड केली. अंध मुलींनी लंडन येथील फुटबॉल स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा जिंकली आहे याचे फारच कौतुक वाटले. त्यांचा हॉल असंख्य ट्रॉफीज, प्रमाणपत्रे, करण्डक यांनी भरून गेला आहे. एकंदरीत सामाजिक सहयोग संस्थेचा एक महत्वाचा उपक्रम संपन्न झाला.