आपल्या संस्थेच्या माहितीपत्रकावर जी काही कविता आहे त्याप्रमाणे "माझ्या घासातला घास नक्कीच देईन तुला" या वाक्याप्रमाणे आपण आज माळेगाव आश्रम शाळा, संजीवनी वसतिगृह आणि केअरिंग हँडस संचालित कलाश्रम या ठिकाणी जाऊन दिवाळीचा फराळ वाटप केला. परतीला निघालो तेव्हा सगळी मुलं गेटपर्यंत आपल्या सगळ्यांना सोडायला आली ते दृश्य डोळ्यात कायमस्वरूपी साठवून ठेवा🙏 अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांना मिळून या मुलांसाठी आयुष्यभर मदत करत राहायचे आहे👍